Mon, Apr 22, 2019 16:21होमपेज › Belgaon › हुश्श... सुटलो एकदाचे !

हुश्श... सुटलो एकदाचे !

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 8:31PMनिपाणी ; प्रतिनिधी

कर्नाटकात 23 मार्चपासून सुरू झालेली दहावीची परीक्षा 6 एप्रिल रोजी संपली शेवटचा पेपर समाज विज्ञान विषयाचा होता. परीक्षा संपताच विद्यार्थी हुश्श.... सुटलो एकदाचे, असे म्हणत मित्रांसमवेत हसतमुख चेहर्‍याने बाहेर पडताना दिसून आले.  यंदा निपाणी विभागामध्ये एकूण 11 केंद्रावर 3900 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षेत एकही विद्यार्थी डिबार झाला नाही. सुरुवातीपासून सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे केवळ परीक्षेच्या आधी अर्धा तासच केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांची वर्दळ दिसून आली.

सर्व केंद्र आवारात पोलिसांनी सुमारे 200 फूट अंतरावर परीक्षा सुरु झाल्यापासून संपेपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला. गेल्या आठ दहा दिवसांत निपाणी गटशिक्षणाधिकारी रामनगौडा व शारीरिक शिक्षण संयोजक  व्ही. के. सनमुरी  यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने भेटी देऊन पाहणी केली. शुक्रवारी परीक्षा संपली असून आता विद्यार्थ्यांसह शिक्षकांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.  येत्या काही दिवसांत निकालाची तारीख जाहिर करण्याची तयारी शिक्षण खात्याने चालविली  आहे. त्यादृष्टीने उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत होणार आहे.
 

 

 

tags : Nipani,news, the tenth exam ended Students enjoy