निपाणी : प्रतिनिधी
कुर्ली पाणंद रस्त्यालगतच्या सौंदलगा हद्दीतील नेर्ले मळ्यातील तीन एकर उसाला शॉर्टसर्किटने आग लागल्याने जळून झाल्याने सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. ऊसपीक क्षेत्रावरून गेलेली 11 के.व्ही. क्षमतेची विद्युतभारित तार तुटू्रन पडल्याने शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. सर्व्हे नंबर 241 मधील तीन एकरामध्ये सौंदलगा येथील दादू कृष्णा नेर्ले, उत्तम सदाशिव नेर्ले, दत्तात्रय बाळकृष्ण नेर्ले, महादेव ज्ञानदेव नेर्ले, अशोक ज्ञानदेव नेर्ले, वसंत बाळकृष्ण नेर्ले, विष्णू बाळकृष्ण नेर्ले, विजय बाळकृष्ण नेर्ले यांचे ऊस पीक आहे.
दुपारी अचानकपणे वीजतार तुटल्याने पिकाने अचानक पेट घेतला शेतकर्यांची वर्दळ कमी होती.त्यामुळे उशिरापर्यंत ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. घटना लक्षात येताच शेतकरी व नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. त्यामुळे संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले.