Wed, Jul 24, 2019 14:58होमपेज › Belgaon › सौंदलग्याजवळ अपघातात तिघे गंभीर

सौंदलग्याजवळ अपघातात तिघे गंभीर

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 10:55PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीतील वेदगंगा नदीपुलाजवळ पुण्याहून हैद्राबादकडे निघालेल्या भरधाव कारचा टायर फुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकली. यामध्ये कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास झाला. गंभीर जखमी तिघांवर निपाणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेची नोंद ग्रामीण पोलिसांत झाली आहे.
मूळचे हैद्राबाद येथील रहिवासी राजेश अनकांती (वय 27), पवनकुमार दवणे (वय 28), चाणक्य बोमणी (वय 28) हे पुणे येथे एका कंपनीत सर्व्हिसला असतात.

ते शुक्रवारी रात्री कारमधून पुण्याहून हैद्राबादकडे जात होते. कार वेदगंगा नदीपुलाजवळ आली असता चालकाकडील बाजूचा मागील टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व भरधाव कार जवळपास 100 फूट फरफटत पाटील मळ्याच्या लहान भुयारी मार्ग पुलाच्या कठड्यावर आदळली. यामध्ये कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. कारमधील एअर बॅग उघडली नाही. मात्र बेल्टमुळे तिघेही सुदैवाने बचावले.त्यांना उपचारासाठी 108 वाहनातून म. गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात कारचा चक्काचूर झाली. पुंज लॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी भेट देऊन रस्त्यातील वाहन बाजूला केले. यावेळी कारमधील राजेश यांचा 70 हजार रु. अज्ञातांनी लांबविला. घटनास्थळी निपाणी ग्रामीणचे सहाय्यक फौजदार के.एस.कल्लापगौडर यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत राजेश यांनी फिर्याद नोंदविली आहे.