Fri, Jul 03, 2020 03:27होमपेज › Belgaon › निपाणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या बंगल्यात चोरी

निपाणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या बंगल्यात चोरी

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 10:26PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी 

 निपाणीचे रहिवासी व मुंबई येथील सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस सुरेश वालीशेट्टी यांच्या शहराबाहेरील प्रतिभानगरातील बंगल्यात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. त्यानुसार घटनास्थळी निपाणी शहर पोलिसांची भेट देऊन पाहणी केली. यावेळी चोरट्यांनी नेमका ऐवज व रोकड किती लांबविली, हे समजू शकले नाही. वालीशेट्टी हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई वास्तव्यास आहेत. त्यांचा शहराबाहेरील प्रतिभानगरात पुणे बंगळूर राष्टीय महामार्गाला लागून दुमजली बंगला आहे.

या बंगल्यात त्यांची आई व अन्य नातेवाईक राहावयास असतात. गेल्या चार आठ दिवसांपूर्वी त्या बंगल्यास कुलूप लावून मुंबई येथे वालीशेट्टी यांच्याकडे गेल्या होत्या. नेमकी ही संधी साधून चोरट्यांनी वालीशेट्टी यांच्या बंगल्याच्या टेरेसवरील गॅलरीचा लाकडी दरवाजा फोडून आत प्रवेश केला. घरात असलेली तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आले. दरम्यान, दुसर्‍या एका कपाटातील रोकड व ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत शहर पोलिसांत नोंद झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून शहर व परिसरात घरफोडीचे सत्र सुरू असून आतापर्यंत जवळपास 30 ठिकाणी चोर्‍या झाल्या आहेत.पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली असून ग्रामीण भागातील नागरिकांनीही गस्त चालविली आहे.