Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Belgaon › ढगाळ वातावरणामुळे तंबाखू उत्पादक चिंतेत

ढगाळ वातावरणामुळे तंबाखू उत्पादक चिंतेत

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 05 2017 9:49PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

ओखी वादळामुळे निपाणी परिसरात दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी पावसाचे थेंब पडू लागल्याने तंबाखू उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. यावर्षी तंबाखू पीक चांगल्या प्रकारे हाती लागेल का, याची विवंचना शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

सष्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने तंबाखू पिकाची हानी झाली होती. यातून बचावलेला तंबाखू तग धरून असताना आता ओखी वादळाने परिसरात ढगाळ वातावरण पसरले असून तंबाखूची घळ वाळवायची कशी, याची चिंता शेतकर्‍यांना आहे. सध्या परिसरात तंबाखूचे पीक अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरच्या उत्तरार्धात   ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तंबाखूची कापणी होणार आहे. या काळात पाऊस पडला तर तंबाखूचे मोठे नुकसान होते. रब्बी हंगामातील गहू, हरभरा व अन्य पिकांची परिस्थिती चांगली आहे. पाऊस झाला तर या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रब्बी हंगाम साधण्यासाठी शेतकरी रात्री 4 तास व दिवसा 3 तास मिळणार्‍या विजेवर पाणी पाजू लागला आहे.