Fri, Feb 22, 2019 21:54होमपेज › Belgaon › निपाणीकरांचा असंतोष मूक मोर्चातून व्यक्त

निपाणीकरांचा असंतोष मूक मोर्चातून व्यक्त

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 30 2017 12:17AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

कागवाड आणि मुडलगी तालुक्यांची घोषणा  पहिल्या यादीत झाली. खरे तर निपाणी आणि कित्तूर या दोन तालुक्यांची घोषणा सरकारने अर्थसंकल्पावेळीच केली होती. पण निपाणीचा तालुका दर्जा मागे पडला आणि मुडलगी व कागवाडला आधी दर्जा मिळाला. परिणामी निपाणीकरांमध्ये नाराजी आहे.  शुक्रवारी नाराजीतूनच निपाणीत सर्वपक्षीय मोर्चा निघाला. मोर्चामध्ये उपनगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, नम्रता कमते, शुभांगी जोशी, सुनीता होनकांबळे, नीता लाटकर, रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, जुबेर बागवान, मुन्ना काझी, राजेश कदम,  सचिन पोवार, अस्लम शिकलगार, अनिल शिंदे, प्रकाश पाटील, रवींद्र चंद्रकुडे, विजय कांबळे, अ‍ॅड.प्रकाश पालकर, अ‍ॅड.दत्ता माद्याळकर, बाबासाहेब पाटील,  अजय माने, अविनाश कुलकर्णी, अभय मगदूम, विजय मेत्राणी यांच्यासह तालुक्यात येणार्‍या विविध  गावातील संघ-संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. पोलिसांनी या काळात कडक बंदोबस्त ठेवला होता.

निपाणी तालुक्यासाठी  प्रयत्नशील ः काकासाहेब निपाणी तालुक्याची पहिल्या यादीत घोषणा का झाली नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी पुढारीला दिली. पाटील म्हणाले, तांत्रिक कारणामुळे निपाणी तालुक्याची घोषणा पहिल्या यादीत झालेली नाही, असे दिसते. त्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि महसूल मंत्री कागोडू थिम्मप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यातून सकारात्मक फलनिष्पत्ती अपेक्षित आहे.