Sat, Feb 16, 2019 06:46होमपेज › Belgaon › निपाणीनजीक अपघातात प्रभारी प्राचार्य जागीच ठार

निपाणीनजीक अपघातात प्रभारी प्राचार्य जागीच ठार

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 22 2017 12:13AM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी   

दुचाकी? ट्रॅकर व बस यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात प्रभारी प्राचार्य अशोक खंडेराव किल्लेदार (वय 55) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. निपाणी? गळतगा मार्गावरील  भीमापूरवाडीनजीक सुतार मळ्याजवळ गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास हा अपघात घडला. 

मूळचे निडसोशी (ता. हुक्केरी) येथील किल्लेदार हे बेडकीहाळ येथे कुटुंबासह राहत होते. कारदगा (ता.चिकोडी) येथील डी. एम. नाडगे संयुक्त प. पू. महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

अशोक किल्लेदार हे दुचाकीवरून गुरुवारी रात्री निपाणीच्या दिशेने येत होते. भीमापूरवाडीजवळील सुतार मळ्यानजीकच्या वळणावर अक्‍कोळ? बेडकीहाळ मार्गावरून ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर व  इचलकरंजीहून निपाणीकडे येत असलेली बस यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीला  धडक बसली.