Tue, Nov 20, 2018 13:08होमपेज › Belgaon › निपाणी आंदोलनाची सरकारकडून दखल

निपाणी आंदोलनाची सरकारकडून दखल

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:33AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

निपाणी तालुक्यासाठी निपाणी परिसरातील जनता रस्त्यावर उतरल्याची दखल घेऊन जिल्हा पालकमंत्री व प्रशासनाने बेळगावात बैठक घेऊन निपाणीला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी शिफारस केली आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सहीने पुढील कारवाईसाठी पाठवून दिला असल्याची माहिती माजी आ. सुभाष जोशी यांनी दिली. 

येथील प्रवासी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रा.जोशी म्हणाले, निपाणी तालुक्यासाठी झालेले आंदोलनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी माजी आ. काकासाहेब पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, लक्ष्मणराव चिंगळे तसेच आपणास बोलावून घेत चर्चा केली. त्यांनी निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ, चिकोडी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनाही पाचारण करून निपाणी तालुका व्हावा, यासाठी आवश्यक कागदपत्रांवर सही करून गॅझेट नोटिफिकेशनसाठी सरकारकडे शिफारस केली.