Fri, Apr 26, 2019 15:31होमपेज › Belgaon › निपाणी नगराध्यक्ष आरक्षण बदलाचा भाजपला धक्‍का

निपाणी नगराध्यक्ष आरक्षण बदलाचा भाजपला धक्‍का

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMनिपाणी : प्रतिनिधी

येथील नगरपालिकेत बहुमताचा दावा करणार्‍या भाजपला शुक्रवारी नगराध्यक्षपदाचे आरक्षण बदलल्याने मोठा धक्‍का बसला. राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रात निपाणीसह 13 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण बदलल्याचा उल्‍लेख केला आहे. 

निपाणीचे सामान्य महिला असे आलेले आरक्षण बदलून एस. टी. करण्यात आले आहे. या पदासाठी काँग्रेसप्रणीत शहर विकास आघाडीचे वॉर्ड क्र. 14 मधून निवडून आलेले दत्तात्रय नाईक हे एकमेव असून, नगराध्यक्षपदासाठी ते पात्र ठरले आहेत. पालिका निवडणुकीत भाजपला 13, काँग्रेसप्रणीत शहर विकास आघाडीला 12 व अपक्षांना 6 जागा मिळाल्या. 3 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या आरक्षणात नगराध्यक्षपदाचे आरक्षण सामान्य महिला असे आले होते. त्यानुसार भाजपने अपक्षांना बरोबर घेऊन बहुमताचा दावा केला होता. आता आरक्षणच बदलून आल्याने भाजपच्या इच्छा-आकांक्षावर पाणी फिरले आहे. आता या आरक्षणाविरोधात भाजप उच्च न्यायालयात दाद मागणार की निवडणुकीला सामोरे जाणार, याविषयी शहरात चर्चा रंगली होती.