Tue, Nov 19, 2019 10:04होमपेज › Belgaon › लक्झरी बसची ट्रॅक्टरला धडक

लक्झरी बसची ट्रॅक्टरला धडक

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 30 2017 12:28AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गोटूर फाट्यानजीक ऊस तोडणी मजूरटोळीच्या ट्रॅक्टरला लक्झरी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 6 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. रोहन दैवान आंधळे (रा.गोपाळपूर, ता. दरुर, जि. बीड) असे बालकाचे नाव आहे. तर त्याचे आई, वडील, भाऊ अन्य एक दाम्पत्य असे पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींवर गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेची नोंद संकेश्‍वर 

पोलिसात झाली आहे. ऊसतोडणी करणारे दैवान एकनाथ आंधळे (वय 35) हे आपल्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून हिराशुगर कारखान्याकडे कुटूंब व अन्य एका मित्रांसमवेत आले आहेत. शुक्रवारी सकाळी ते गोटूरनजीकच्या माळावरून संकेश्‍वरकडे ऊस तोडणीसाठी ट्रॅक्टरट्रॉली घेवून जात होते. ट्रॉलीमध्ये त्यांच्यासह पत्नी निलाबाई, मुलगा राहुल (वय 8) तसेच मित्र विनोद रामा भालेकर (वय 30) व त्यांची पत्नी रेणुका (वय 25) हे बसले होते. गोटूर पुलानजीक आल्यानंतर बंगळूरकडे निघालेल्या लक्झरी बसने ट्रॅक्टरला धडक दिली.

त्यामुळे ट्रॅक्टर मुख्य रस्त्यापासून सुमारे 200 फूट अंतरावर जावून थांबला. रोहनच्या अंगावरुन बसचे चाक गेल्याने मृतदेहाचा चेंदामेंदा झाला.  अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक एच.डी.मुल्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर ट्रॅॅक्टर मालक  दैवान यांनी बसचालक मंहमद सलीम रायचूर (वय 35, रा.हुबळी) याच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी तपास चालविला आहे.