Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Belgaon › पत्ता विचारण्याच्या बहाण्याने  तीन तोळ्यांचे दागिने लंपास

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने  तीन तोळ्यांचे दागिने लंपास

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:23PMनिपाणी : प्रतिनिधी

शहराबाहेरील साई शंकरनगर येथे सोनाली तिबिले यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन तोळ्याचे गंठण चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हातोहात लांबवले. चार महिन्यांतील ही सातवी घटना असल्याने पोलिसांविषयी सांशकता व्यक्‍त होत आहे. सोनाली आपल्या घरासमोरील शेजार्‍यांच्या घरी जात होत्या. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना कागद दाखवून हा पत्ता कुठे आहे, अशी विचारणा केली. सोनाली मजकूर पाहत असता दुचाकीवर मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील गंठण लांबवून दुचाकीवरून महामार्गाच्या दिशेने पोबारा केला.

सोनाली यांनी आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन चोरट्यांचा  शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. विशेष म्हणजे बसवेश्‍वर चौक पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.. सोनाली यांनी पोलिसांना माहिती दिली. गेल्या चार महिन्यात धूम स्टाईल प्रकाराने चोरी करणार्‍यांनी अशोकनगर तसेच जुन्या पी.बी.रोडवरून तीन रोख रकमेच्या बॅगा तर तीन महिलांच्या गळ्यातील दागिने लुटून पोबारा केला. सीसीटीव्ही कॅमेरे असूनही एकाही घटनेचा तपास लागलेला नाही.