Sun, Nov 18, 2018 17:37होमपेज › Belgaon › निपाणीतील अभियंत्याचा  पुण्यात अपघातात मृत्यू

निपाणीतील अभियंत्याचा  पुण्यात अपघातात मृत्यू

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 30 2018 12:19AMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे येथे अभियंता म्हणून नोकरीसाठी असलेल्या येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. श्रीनिधी अरूण फुंडीफल्ले (वय 28, रा. इटेकरी गल्ली, निपाणी) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीनिधी फुंडीफल्‍ले हा पुण्यातील एका नामवंत कंपनीत अभियंता म्हणून सेवेत होता. 23 रोजी सायंकाळी कामावरून कात्रज येथील रूमकडे दुचाकीवरून परत येत असताना अपघात झाला होता. श्रीनिधी फुंडीफल्‍ले हा रहात असलेल्या वसाहतीतील रूमच्या कोपर्‍यावर आल्यावर हा अपघात झाला.

समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराने श्रीनिधीच्या दुचाकीला जोराची धडक दिली होती. या अपघातात श्रीनिधी दुचाकीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता. तातडीने उपचारसाठी पुण्यातील खासगी रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. श्रीनिधी फुंडीफल्‍ले हा निपाणी पालिकेचे सेवानिवृत अभियंते अरूण फुंडीफुल्ले यांचा मुलगा होता.त्याच्या पश्‍चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. 30 रोजी रक्षाविसर्जन आहे.