Thu, Sep 20, 2018 17:58होमपेज › Belgaon › निपाणीत सिटी सर्व्हेअरची कार्यकर्त्यावर दादागिरी

निपाणीत सिटी सर्व्हेअरची कार्यकर्त्यावर दादागिरी

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 11:59PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

गांधी चौक येथील सिटी  सर्व्हेअर कार्यालयातील आर. यू. तेवरे या अधिकार्‍याने बुधवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन बुडके यांच्यावर दादागिरी करत उध्दट वर्तन केली. बुडके यांनी तेवरे यांना धारेवर धरून कर्तव्याची जाण करून दिली. जिल्हा मुख्यालयातील अधिकार्‍यांसमोर हा प्रकार घडला. या कार्यालयातून नागरिकांना कागदपत्रे,  नकाशा प्रत वेळेत दिली जात नाही. उलट अधिकार्‍यांनी नेमलेल्या दलालांचे हात ओले करूनच नागरिकांना काम करून घ्यावे लागते. काही दिवसांपूर्वी बुडके यांनी या कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे मिळावीत, असा अर्ज केला होता. त्याला बराच कालावधी लोटूनही पूर्तता झाली नाही. याचा जाब विचारण्यासाठी बुडके यांनी दुपारी कार्यालय गाठले. उलट तेवरे यांनी आपण कोण, किती वर्षे निपाणीत राहता, असा सवाल केला. 

जिल्हा मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी कार्यालयाच्या कामकाज पाहणीसाठी आले होते. त्यांच्यासमोर बुडके यांनी येथील कर्मचार्‍यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचला. त्यांनी बुडके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बुडके यांनी नकाशा व इतर कागपत्रांच्या मागणीसाठी भराव्या लागणार्‍या फॉर्मची नक्कलप्रत असावी. मात्र ती नसल्याने तेवरेंसह वरिष्ठांना धारेवर धरले. स्वत:ला न मिळालेल्या कागदपत्रांची कधी पूर्तता करणार, असा सवाल केला. माजी नगरसेविकेलाही कार्यालयातील अधिकार्‍यांनी तब्बल तीन महिने फेर्‍या मारावयास लावल्याचे नागरिकांनी अधिकार्‍यांसमोर पत्रकारांना सांगितले.