Mon, Aug 19, 2019 18:47होमपेज › Belgaon › चार महिन्यांमध्ये ३५ चोर्‍या-लुटी

चार महिन्यांमध्ये ३५ चोर्‍या-लुटी

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 8:46PMनिपाणी : मधुकर पाटील

निपाणी शहरात गेल्या सप्टेंबरपासून आजतागायत साडेचार महिन्यात 35 हून अधिक घरफोडी, महिलांच्या अंगावरील दागिने लुटीच्या चार घटना, याशिवाय बॅग लंपासच्या दोन घटना तसेच दुचाकी चोरीच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. निपाणी शहर चोरट्यांचे लक्ष्य बनले असून आतापर्यंत एकही अटक नाही. संपूर्ण शहर  40 सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नजरेखाली आले, असा गवगवा करण्यात आला.पण वास्तव मात्र खूप वेगळे आहे.अर्थात आहे त्या कॅमेर्‍यावरील चित्र शहर स्थानकात असलेल्या स्क्रिनवर व्यवस्थित दिसत नसल्याची बाब पुढे आली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन झाले.

त्यावेळी आता या शहरात मुख्य रस्त्यावर घडलेली कोणतीही घटना लपून राहणार नाही, असे सांगण्यात आले. पण हमखास रस्ते व चौकात  आज कॅमेरेच नाहीत ही वस्तूस्थिती आहे. गेल्या साडेचार महिन्यात शहर व उपनगरात घरफोड्यांनी एकसारखा सपाटा लावला आहे. शिवाय दिवसाआड दागिने व बॅग लुटीच्या आजही दिवसाआड असे प्रकार सुरूच आहेत. अर्थात झालेल्या घटनांचे चित्रण पाहण्यासाठी पोलिस व कार्यकर्ते या दरम्यान गेले. पण पोलिसांनी त्या परिसरात कॅमेरेच नाहीत, शिवाय असलेल्या कॅमेर्‍यामध्ये अस्पष्ट चित्रीकरण असल्याचे सांगितले.

यापूर्वी घडलेल्या चेन स्नॅचिंग, चोर्‍या, दरोडे, लुटमार, हाणामारी या घटना पाहता मुख्य बाजारपेठ, बँका परिसर, सराफ पेठ, महत्वाचे चौक, ठिकाणे हेरून आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित करणे गरजचे आहे. तसे झाले तरच निपाणी संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या कक्षेत आहे या म्हणण्याला अर्थ राहणार आहे.