Wed, May 22, 2019 23:24होमपेज › Belgaon › पोलिस प्रमुखांच्या ‘सरप्राईज’ भेटीने निपाणीत तारांबळ

पोलिस प्रमुखांच्या ‘सरप्राईज’ भेटीने निपाणीत तारांबळ

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMनिपाणी : प्रतिनिधी

नुतन जिल्हा पोलिस सुधीरकुमार रेडी यांनी सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास निपाणीला सरप्राईज भेट दिली .विशेष म्हणजे बेळगाव येथे रूजु झाल्यानंतर ते कोणतीही पुर्वकल्पना न देता भेटीवर आल्याने पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची पुरती तारांबळ उडाली. गेल्या 20 जानेवारी रोजी बेळगाव येथे रूजू झालेले रेडी हे मुळचे आंध्र प्रदेश येथील असुन ते कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित आहेत.

ते रुजू झाल्यांनतर त्यांनी चांगल्या प्रकारे कायदा व सुव्यवस्था हाताळली आहे. यामध्ये त्यांनी अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केले असून त्याचे समुळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अर्थात बेकायदा दारू विक्री, मटका, जुगार यासारख्या व्यावसायीकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हयातील सर्व त्या स्थानक प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे अवैध व्यावसायीकांचे धाबे दणाणले  आहेत.

गत महिन्यात रूजू झालेल्या रेडी यांनी बेळगाव शहर वगळता सोमवारी पहिल्यांदाच निपाणी पोलीस सर्कलला भेट दिली. अचानकपणे त्यांनी ग्रामीण स्थानकात येवून सीपीआय किशोर भरणी यांच्याशी चर्चा करीत रात्री उशिरापर्यंत ठाण मांडल्याने सर्कलमधील शहर, ग्रामीण, बसवेश्‍वर चौक तसेच खडकलाट पोलिस स्थानकातील अधिकारी व कर्मचार्‍यांची पुरती तारांबळ उडाल्याचे दिसून  आले.