Sat, Apr 20, 2019 08:42होमपेज › Belgaon › सहकारामुळेच स्थिर जीवन : सकलकीर्ती महाराज

सहकारामुळेच स्थिर जीवन : सकलकीर्ती महाराज

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

सहकार हाच समाजाला आणि माणसाला स्थिर जीवन देतो, असे प्रतिपादन सकलकीर्ती महाराज यांनी केले. ते निपाणी येथे नव्याने सुरू झालेल्या श्री पद्मपद्मावती मॉयनॉरिटी को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते.  अध्यक्षस्थानी माजी आ. सुभाष जोशी हे होते.

सहकार हा ग्रामीण विकासाचा पाया असल्याचे मनोगत द. भा. जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. दीपप्रज्वलन शोभा उपाध्ये, स्नेहा बेडकिहाळे,सतेज हरदी यांनी केले. स्वागत वासुदेव गुंडे यांनी तर प्रास्ताविक चेअरमन प्रशांत गुंडे यांनी केले. संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी आ. शशिकला जोल्ले, माजी आ. काकासाहेब पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, टाऊन प्लॅनिंगचे चेअरमन

बाळासाहेब देसाई, चंद्रकांत कोठीवाले, राजेश कदम, श्रीकांत परमणे, शंतनू मानवी, डॉ. दिवाणी, विजयराजे निपाणकर संस्थेचे संचालक राजीव रांगोळे, रवींद्र श्रीप्पाणावर, रवीप्रसाद आवटे, शीतल इंचलकर, श्रेयस करगावे, प्रा. कांचन पाटील आदी उपस्थित होते.