Wed, Jul 24, 2019 12:50होमपेज › Belgaon › कोल्हापूरच्या महिलेचा निपाणीत अपघाती मृत्यू

कोल्हापूरच्या महिलेचा निपाणीत अपघाती मृत्यू

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:17PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी-मुरगूड मार्गावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील महिलेचा मृत्यू झाला. नौशाद सलीम पठाण (32 रा.मोहिते कॉलनी कळंबा) असे तिचे नाव आहे. तिचा भाऊ नदीम इस्माईल चौचे (24 रा. राधानगर, सध्या रा. कोल्हापूर) हा जखमी झाला. अपघात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास झाला. घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली आहे. 

नदीम हा त्यांच्याकडे राहावयास असून त्या त्यांच्या समवेत दुचाकीने कोल्हापूरहून येथील हजरत पिरानेपीर दर्ग्याच्या दर्शनासाठी आल्या होत्या.दर्शन घेऊन ते  ल्हापूरकडे परतत होते. त्यांची दुचाकी लै भारी मॉलसमोर आली असता मागून येणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात मागे बसलेल्या नौशादसह नदीम खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पळ काढला.

जखमी दोघांनाही तातडीने म. गांधी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच नौशाद यांचा मृत्यू झाला. नदीम याच्यावर उपचार सुरू आहेत. शहर फौजदार अशोक चव्हाण, साहाय्यक डी. बी. कोतवाल, हवालदार एस. एस. चिकोडी, बसवराज न्हावी यांनी  पाहणी केली. नौशाद यांच्या मृत्यूची बातमी कळताच स्थानिक व कोल्हापूर येथील नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. नौशाद यांच्या पश्‍चात पती, दोन मुले  आहेत.