Wed, Nov 21, 2018 17:49होमपेज › Belgaon › पट्टणकुडीत शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या

पट्टणकुडीत शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:10PMनिपाणी : प्रतिनिधी

पट्टणकुडी बसस्थानकासमोरील कागे मळा येथे 70 वर्षीय वृध्दाने नारळाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वसंत बंडू कांबळे असे त्याचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. रविवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास घरातून बाहेर पडून शेताकडे गेले. त्यांनी नारळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी चारा आणण्यास गेलेल्या काही शेतकर्‍यांच्या नजरेस कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.

त्यांनी घरच्यांना माहिती दिली. घटनास्थळी कुटुंबीयांसह नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खडकलाटचे पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, हवालदार, केे. के. सनदी, आनंद पांडव, विनोद कंग्राळकर यांनी जाऊन पंचनामा केला. कांबळे यांच्या पश्‍चात पत्नी,  मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.