Wed, Jul 08, 2020 00:32होमपेज › Belgaon › खानापूरसह निपाणी, चिकोडीत आज मतदान

खानापूरसह निपाणी, चिकोडीत आज मतदान

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 10:50PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील 2 नगरपालिका, 10 नगरपरिषदा, 2 नगर पंचायतींमध्ये शुक्रवारी मतदान होत आहे. प्रथमच मतदानयंत्राद्वारे मतदान  होईल. मतदानादिवशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीतील शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली आहे. राज्यातील एकूण 105 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शुक्रवारी मतदान होईल. निपाणी, चिकोडी, खानापूर, गोकाक, सदलगा, सौंदत्ती, कुडची, कोन्‍नूर, हुक्केरी, संकेश्‍वर, रायबागमधील 343 प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. भाजपन, काँग्रेस आणि निजदचे एकूण 499 आणि 488 अपक्ष असे एकूण 987 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. बहुतेक ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होईल.  

निपाणीच्या 31 जागांसाठी 130 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद होणार आहे. तर चिकोडीत 23 जागांसाठी 80 उमेदवार आहेत. खानापूरमध्येही 20 जागांसाठी 80 उमेदवार आहेत. संकेश्वरमध्यही मोठी चुरस आहे. 22  जागांसाठी 54  उमेदवार  रिगणात आहेत.