Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Belgaon › निपाणीनजीक टायर फुटल्याने कारला अपघात

निपाणीनजीक टायर फुटल्याने कारला अपघात

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 22 2018 10:32PMनिपाणी : प्रतिनिधी

 पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील पहिल्या धोकादायक वळणावर बेळगावहून सोलापूरकडे जाणार्‍या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये सोलापूर येथील 8 जण जखमी झाले.हा अपघात सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास झाला. सोलापूर  येथील  कारचालक  आनंद श्रीकांत रामपुरे ( 30) हे कारमधून देवदास लोखंडे र(45) रा. मुंबई, तेजल रामपुरे(25),अवनिश रामपुरे (2),अद्वैत रामपुरे ( वय 10 महिने), अशिष रामपुरे(20), सविता रामपुरे (52), रा.सोलापुर व शिवबा लोखंडे (44) रा. मुंबई यांच्यासह सोलापूरकडे निघाले होते.घाटातील पहिल्या वळणावर कारचा डाव्या बाजुचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव असणारी कार पलटी झाली.

यामध्ये चालकांसह आठ जण जखमी झाले.त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी 108 वाहनाने सरकारी म. गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार दाखल करण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर येथे हलविण्यात आले.दरम्यान, अपघात घडताच खोळंबलेली वाहतूक पुंजलॉईडच्या भरारी पथकाने बाजूला करून सुरळीत केली. घटनास्थळी शहर स्थानकाच्या महिला फौजदार एस.जी.खानापुरे, सहाय्यक फौजदार एम.जी.निलाखे यांनी भेट देवून पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली नव्हती.