Wed, May 27, 2020 02:11होमपेज › Belgaon › विभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे

विभाजनानंतर चिकोडी तालुक्यात 60 गावे

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:34PM

बुकमार्क करा
निपाणी ः महादेव बन्ने

राज्य शासनाकडे दि.1 जानेवारी रोजी निपाणी तालुक्यासाठी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमुळे चिकोडी तालुक्याचे विभाजन निश्‍चित झाले आहे. त्यामुळे यापूर्वी 103 गावांचा असणारा चिकोडी तालुका आता एकूण 3 सर्कलमध्ये येणार्‍या 60 गावांपूरता राहणार आहे. तर पूर्वीची महसुली 43 गावे व नवीन 12 अशी 55 गावे नूतन निपाणी तालुक्यास जोडण्यात आली आहेत. नव्या चिकोडी तालुक्यामध्ये चिकोडी सर्कलमधील चिकोडी, केरुर, अंकली, मांजरी, इंगळी, येडूर, चंदूर, शिरगांव, गिरगांव, चिंचणी, नाईंग्लज, खडकलाट, पीरवाडी, पट्टणकुडी, वाळकी, चिखलव्हाळ, रामपूर, पांगिरे ए, हिरेकुडी, जोडकुरळी, काडापूर, कोथळी, नवलिहाळ, कुठाळी, संकनवाडी, सदलगा सर्कलमध्ये येणारी सदलगा, एकसंबा, कल्लोळ, नणदी, नागराळ, मलिकवाड, जनवाड, नीेज, शमनेवाडी, नागरमुन्नोळी

सर्कलमध्ये येणारी नागरमुन्नोळी, बेळगली, जयनगर, विजयनगर, ममदापूर के.के., कब्बुर, बेळकूड, उमराणी, इटनाळ, करोशी, बंबलवाड, कुंगटोळी, बेन्नीहाळी, मुगळी, कमतेनहट्टी, वड्राळ, मजलट्टी, खजगौंडनहट्टी, जैनापूर, तोरणहळ्ळी, हत्तरवाट, मांगनूर, बिद्रोळी, करगांव, डोणवाड, हंचिनाळ के.के. या गावांचा समावेश आहे. शिवाय महूसल विभागात न येणार्‍या शिरगाववाडी, पोगट्यानहट्टी, मिरापूरवाडी, मनुचीवाडी, जोडट्टी, केंचानहट्टी, कुप्पानवाडी, रूपनाळ, नणदीवाडी, तपकारवाडी, हंद्यानवाडी, धुळगनवाडी, येडूरवाडी आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. महसुली गावांची एकूण लोकसंख्या 3,27,352 व वाडीवस्त्यांची लोकसंख्या 18,668 मिळून तालुक्याची एकूण लोकसंख्या 3,46,020 पर्यंत राहणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा तालुका म्हणून चिकोडीकडे पाहिले जाते. या तालुक्यात पूर्वी चिकोडी, निपाणी व सदलगा असे 3 विधानसभा मतदारसंघ होते. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सदलगा मतदारसंघ गोठवून केवळ निपाणी व चिकोडी-सदलगा हे दोनच मतदारसंघ ठेवण्यात आले. लोकसंख्या व भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या या तालुक्याच्या विभाजनाची मागणी अनेक वर्षापासून होत होती. ती आता निपाणी तालुक्याच्या निर्मितीमुळे पूर्णत्वास जात आहे.