Thu, Feb 21, 2019 16:12होमपेज › Belgaon › ‘अन्नभाग्य’चा 30 टन तांदूळ जप्त

‘अन्नभाग्य’चा 30 टन तांदूळ जप्त

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 12:00AMनिपाणी : प्रतिनिधी 

रेशनवर पुरवठा होणार्‍या अन्नभाग्य योजनेतील सुमारे 30 टन तांदूळ खुल्या बाजारात नेला जात असताना आज (मंगळवारी) पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. शिवाय, चार संशयितांना अटक केली आहे. 
ट्रक, टेम्पो असा एकूण 30 लाखांचा मुद्देमालही बेळगाव गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (डीसीबी) जप्त केला. हुक्केरी तालुक्यातील बस्तवाड येथे पथकाने ही सोमवारी मध्यरात्री कारवाई केली. पंधरवड्यापूर्वी टिळकवाडीत छापा टाकून असाच अन्नभाग्यचा तांदूळ जप्त करण्यात आला होता. बस्तवाड येेथे एका खासगी गोडावूनमध्ये तांदळाचा बेकायदा साठा करून त्याची विक्री महाराष्ट्रात होत होती, अशी माहिती डीसीबी विभागाला मिळाल्याने सापळा रचून कारवाई करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत बेळगाव, निपाणी, संकेश्‍वर या ठिकाणी चार वेळा अशी कारवाई झाली आहे.