Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Belgaon › खडकलाट रस्ताकामासाठी १ कोटी मंजूर

खडकलाट रस्ताकामासाठी १ कोटी मंजूर

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 10:29PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

खडकलाट येथे विविध विकासकामांसाठी 1 कोटी रु. अनुदान मंजूर केले असल्याची माहिती खा. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांनी दिली.  खडकलाटमधील कमते गल्ली ते फुटाणवाडीपर्यंतच्या 1 कि.मी. रस्ताकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत खडकलाट गावच्या व्याप्तीत येणार्‍या संकेश्‍वर-सदलगा राज्य महामार्ग 97 मध्ये येणारे 28.49 कि.मी. ते 28.50 कि.मी.पर्यंतच्या रस्ता सुधारणेसाठी 1 कोटी रु.मंजूर झाले असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आ.गणेश हुक्केरी म्हणाले, नागरिकांच्या मागणीनुसार सदर काम हाती घेण्यात आले आहे.

 खडकलाट येथील 187 लाभार्थ्यांना बसववसती, इंदिरा आवास, आंबेडकर वसती योजनेतंर्गत घरकुल हक्कपत्रांचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच 65 लाभार्थ्यांना मोफत गॅसकिट वितरण करण्यात आले. कार्यक्रमास सतीश पाटील, राकेश चिंचणे, रमेश पाटील, ग्रा.पं.अध्यक्ष राजू हेग्गण्णा, प्रवीण पाटील, शंकर आवडखान, चंद्रकांत भडगावे, इलियास लाटकर, हबीब परकुटे, चंद्रकांत नाईक, अशोक यादव आदी उपस्थित होते. नवलीहाळ-खडकलाट कॅनॉल रस्त्यासाठी 1.10 कोटी नवलीहाळपासून खडकलाटला जोणार्‍या कॅनॉल रस्त्यावरील पूल व रस्ता डांबरीकरणासाठीं खा. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांनी 1 कोटी 10 लाख रु. मंजूर केले आहेत. 

ग्रा.पं.उपाध्यक्षा पद्मावती बन्ने यांच्याहस्ते जेसीबी मशिनचे पूजन तर ता.पं. सदस्य सुरेश नसलापूरे, मनोहर वाघमोडे, सागर बन्ने, पुरंदर परीट, शिवगोंडा पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. खा. हुक्केरी यांनी नवलीहाळ-खडकलाट या दोन्ही गावांना जोडण्याचा जवळचा मार्ग म्हणून कॅनॉलवरुन रस्ता करण्यात आला होता. या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण व नवलीहाळ येथील ओढ्यावरील पुलाची उंची वाढवून बांधकाम करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आ.गणेश हुक्केरी, कलगोंडा पाटील, आप्पासाहेब हालापगोळ, महादेव चन्नपट्टण, आर. के. कांबळे, रामा वाघमोडे, वसंत हवालदार, निंगाप्पा नसलापुरे, मुत्याप्पा नसलापुरे, हुवाप्पा कौलापुरे, मारुती कौलापुरे, सिध्दाप्पा शिरोळे, चवगोंडा हुव्वाण्णावर, संजय कमते, अशोकराव घोरपडे आदी उपस्थित होते.