Thu, Jun 27, 2019 14:09होमपेज › Belgaon › आंतरराष्ट्रीय तस्करीचे निपाणी सेफ झोन

आंतरराष्ट्रीय तस्करीचे निपाणी सेफ झोन

Published On: Feb 04 2018 9:57PM | Last Updated: Feb 04 2018 8:35PMनिपाणी : प्रतिनिधी

कोगनोळी टोल चुकवून एका कारमधून तब्बल 60 लाख रू. किमतीच्या 157 किलो चांदीची  बेकायदा वाहतूक करणार्‍या तिघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले. 2015 नोव्हेंबर ते आजअखेर घडलेल्या रोकड, दागिने, लूटमार, अंमली पदार्थांची तस्करी आदी घटना महामार्गावरील कोगनोळी ते तवंदी घाट या 30 कि.मी.टापूत  वारंवार घडल्या आहेत. हे पाहता सीमावर्ती निपाणी हा परिसर पुन्हा एकदा आंततराज्य तस्करीचे केंद्र बनत असल्याचे अधोरेखित झाले आहे.  यापूर्वी गेल्या दोन वर्षात बेळगावच्या डीसीबी, डीसीआरबी पथकासह गतवर्षी महामार्गावर मांगूर फाटा येथे सीपीआय पथकाने सोन्या चांदीची तस्करी करणार्‍या आंतरराज्य टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

त्यामुळे प्रवास जरी महाराष्ट्रातून राजरोसपणे होत असला तरी कारवाई मात्र सातत्याने कर्नाटकात झाली आहे. हे पाहता महाराष्ट पोलिसांना होणारी तस्करी दिसत कशी नाही, असा निर्माण झाला आहे. शहराला लागूनचकाही अंतरावर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश या राज्यांना जोडणारे खुश्कीचे मार्ग आहेत. त्यामुळे इतर राज्याच्या अथवा सीमावर्ती भागाच्या तुलनेत निपाणी शहर किमती वस्तूच्या तस्करीमध्ये कायमच चर्चेत असते.त्यामुळे पोलिस, अबकारी, महसूल, कस्टम, आयकर, लोकायुक्‍त, वनविभागाचे या भागावर कायमच लक्ष असते. यापूर्वी निपाणी पोलिस व अबकारी तसेच इतर विभागाने अनेक वस्तूंची कोट्यवधींची तस्करी पकडून अनेकांना जेरबंद केले आहे. दोन वर्षापूर्वी सुमारे 25 लाखांचे रक्‍तचंदन तस्करीचे प्रकरण तत्कालीन फौजदार धीरज शिंदे यांनी उघडकीला आणले होते.

चिकोडी अबकारी विभागाने विदेशी मद्यासह अंमली पदार्थांच्या अनेक घटनांचा एकामागोमाग उलगडा केला. याशिवाय ग्रामीण व बसवेश्‍वर चौक पोलिसांनी गुटखा, गांजा, अफू, चरस, हशीश, कासव, दुतोंडी साप यासारख्या तस्करी रोखल्या आहेत. शुक्रवारी रात्री खास खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील यांनी सहकार्‍यांच्या मदतीने हुपरीहून सेलमकडे जाणार्‍या नेमक्या कारला महामार्गावर टॅप केले. सदर कारमधील तिघाजणांनी कारच्या सीटखाली दागिन्यांसह  लपविलेली 157 किलो चांदी  सापडली.  अशी तस्करीची पध्दत करणारे आणखी कोण आहेत का? यासाठी वेगळे रॅकेट कार्यरत आहे का? याचाही उलगडा पोलिस खात्याला करावा लागणार आहे. तसे जर झाले तर या व अशा व्यवहारातील अनेक प्रश्‍नांचा उलगडा  होणार आहे.  


किंमती वस्तू व पदार्थांची तस्करी करणारे हे महाराष्ट्रातील असल्याचे आजपर्यंत घडलेल्या सर्व घटनांतून दिसून आले आहे. अर्थात  कागल नदी पूल पास झाल्यानंतर महामार्गावरील कोगनोळी,कुर्ली,मांगूर, मुरगूड, शिप्पूर या क्रॉसअंतर्गत तस्करांना पर्यायी रस्ते आहेत. त्याचा फायदा तस्करांकडून उठविला जात आहे. अर्थात पर्यायी रस्त्यामुळेच ही कारवाई उघडकीला आली.

     निंगनगौडा पाटील, पीएसआय


ऑगस्ट 2015 पासून कारवाया सुरूच

निपाणी परिसरात दि.20 ऑगस्ट 2015 रोजी  लक्झरी बसमधून सांगलीतील सराफ कामगारांकरवी जाणारी 21 लाखांची रोकड जप्‍त. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी महामार्गावर यमगर्णी हद्दीत मुंबईहून तामिळनाडूकडे जाणार्‍या ट्रकचालकाला 4 लाखाला लुटण्यात आले, ऑक्टोबरमध्ये दि.19 रोजी वरील टापूतच धाब्यावर थांबलेला दूध टँकर लंपास, दि.5 नोव्हेंबर 2015 रोजी सव्वाकोटीच्या चांदीच्या दागिन्याची तस्करी व  दि.6 एप्रिल रोजी मांगूर फाटा येथे  9 किलो सोने व दीड कोटीची रोकड जप्त करण्यात आली.