Mon, Aug 19, 2019 11:29होमपेज › Belgaon › निपाणी वॉर्ड पुनर्रचना सुधारित आराखडा जाहीर

निपाणी वॉर्ड पुनर्रचना सुधारित आराखडा जाहीर

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:15AM

बुकमार्क करा
निपाणी : महादेव बन्ने

निपाणी नगरपालिकेच्या 2018 साली होणार्‍या निवडणुकीपूर्वी शहरातील वॉर्डांची पुनर्रचना झाली आली आहे. आलेल्या हरकतींवर निर्णय घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नूतन पुनर्रचना ही अँटी क्लॉकवाईज करण्यात आली आहे. या नूतन वॉर्ड रचनेनुसारच नगरपालिकेच्या पुढील निवडणुका होणार आहेत.  पूर्वी अनेक वॉर्डातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त तर काही वॉर्डातील प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, नवीन वॉर्ड रचनेमध्ये लोकसंख्या सारखी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकूण 31 पैकी वॉर्ड 23 मध्ये सर्वाधिक 2579 तर वॉर्ड क्र.30 मध्ये सर्वात कमी 1370 लोकसंख्या ठेवण्यात आली आहे. 

2011 सालच्या जनगणणेनुसार शहराची 68 हजार लोकसंख्या गृहित धरुन वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला केंद्र मानून या वॉर्डांची रचना करण्यात आली आहे. शहरातील लोकसंख्या मोठी असल्याने येथे वॉर्डाचा आकार लहान असून शहराबाहेरील उपनगरांचे वॉर्ड आकाराने मोठे करण्यात आले आहेत. नूतन रचनेनुसार वॉर्ड क्र.13  सर्वाधिक आकाराचे असल्याचे दिसून येते. यापूर्वी 2006 साली 2001 सालच्या जनगणनेनुसार वॉर्डांची रचना करण्यात आली होती. आता करण्यात आलेल्या वॉर्ड पुनर्रचनेत जुने वॉर्ड फुटल्याचे दिसून येत आहे.  वॉर्ड संख्येत मात्र कोणताही बदल करण्यात आला नसून पूर्वीप्रमाणेच 31 वॉर्ड ठेवण्यात आले आहेत.

वॉर्डक्र.1 मध्ये बसस्थानकापासून अकोळरोड येथील काही भाग तर चिकोडी रोड येथील जत्राटवेस पर्यंतचा काही भाग येणार असून या वॉर्डाची 2005 इतकी लोकसंख्या ठेवण्यात आली आहे. वॉर्ड क्र.2 मध्ये धर्मवीर संभाजी सर्कल तसेच जुना पी.बी.रोड व  अशोकनगरमधील काही भाग  जोडण्यात आला असून या वॉर्डाची संख्या 2038 इतकी ठेवण्यात आली आहे. वॉर्ड क्र.3 मध्ये साखरवाडीचा काही भागाचा समावेश असून साखरवाडी ते मंगळवारपेठपर्यंतचा भाग समाविष्ठ करण्यात आला असून याची लोकसंख्या 1813 ठेवण्यात आली आहे. वॉर्ड क्र.4 मध्ये मुरगूड रस्ता ते जवाहर जलाशय परिसर बसवाणनगर, हरीनगर, राष्ट्रीय महामार्ग बायपास परिसर येत असून 2076 इतकी लोकसंख्या ठेवण्यात आली आहे. वॉर्ड क्र.5 मध्ये आश्रयनगर, बसस्थानकापासून ते संगोळ्ळी रायण्णा सर्कलची पश्‍चिम बाजू ते श्रीनगरचा काही भाग समाविष्ट असून 2121 लोकसंख्या निश्‍चित करण्यात आली आहे.