Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Belgaon › राज्य सरकार रिक्षा व्यावसायिकांच्या पाठीशी

राज्य सरकार रिक्षा व्यावसायिकांच्या पाठीशी

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:10AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी 

  काँग्रेस सरकारने तळागाळातील सर्वसामान्यांना स्थैर्य देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. येत्या काळात राज्यासह जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांच्या प्रमुख मागण्या पूर्ण करून त्यांना स्थैर्य मिळवून देण्यासाठी राज्यसरकार रिक्षा व्यावसायिकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही जिल्हा पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांनी दिली. उत्तर कर्नाटक रिक्षा चालक-मालक संघटना हुबळी संलग्नीत  निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटना, निपाणी तथा उत्तर कर्नाटक रिक्षा चालक मालकांच्या हक्कासाठी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात रविवारी झालेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. संघटना अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी स्वागत केले.

प्रास्ताविकात मोहन बुडके यांनी केले. तत्पूर्वी सकाळी नरवीर तानाजी चौकात संघटना कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते  झाले. यावेळी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उत्तम पाटील, अशोककुमार असोदे आदी उपस्थिती होते. संघटनेच्यावतीने मध्यवर्ती शिवाजी चौक येथून रॅली शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख 17 मागण्यांचे निवेदन ना. जारकीहोळी यांना देण्यात आले.

ना. जारकीहोळी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हे व्यावसायिक असूनया सरकारने गोरगरिबांना दिलेल्या एकाही आश्‍वासनाची पूर्तता केलेली नाही.त्यामुळे देशाचा विकास करावयाचा असल्यास अशा सरकारला वेळीच हद्दपार करा. चिंगळे म्हणाले,  या  संघटनेच्या मागण्यांची व समस्यांची पूर्तता व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यापर्यंत पाठपुरावा करून संघटनेला न्याय मिळवून देऊ. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, रिक्षा व्यावसायिकांनी आपल्या प्रमुख 17 मागण्याच्या प्रस्तावास नगरपालिकेमार्फत सर्वोतोपरी सहकार्य करून पाठपुरावा केला जाईल. शिवाय संघटनेसाठी पालिकेमार्फत अ‍ॅटो कॉलनी स्थापन करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून ज्या रिक्षा चालक-मालकांना घरे नाहीत अशांना पालिकेमार्फत त्याचा लाभ मिळवून दिला जाईल.

यावेळी संघटना राजाध्यक्ष शेखरय्या मठपती (हुबळी), जिवन हुक्केरी (धारवाड), रफीक बडेघर (बैलहोंगल) आदींची भाषणे झाली.  कार्यक्रमास आ. विवेक पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते पंकज पाटील, सुजय पाटील, नगरसेवक रविंद्र शिंदे, राजेंद्र चव्हाण, नितीन साळुंखे,  दिलीप पठाडे, महमद मुजावर, संघटना उपाध्यक्ष अजित सटाले, सचिव गजानन खापे, खजीनदार शामराव टिकारे यांच्यासह निपाणी, चिकोडी, बेळगाव, हुबळी, धारवाड, करवीर, कागल, कोल्हापुर, इचलकरंजी येथील रिक्षा व्यावसायिक आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सापडलेली रक्कम,  कागदपत्रे केली परत दरम्यान, या कार्यक्रमासाठी आलेल्या संकेश्‍वर येथील रवींद्र होसमनी या रिक्षा व्यावसायिकाने  सांगली येथील प्रवासी मन्सूर नदाफ यांची विसरलेले पाकीट प्रामाणिकपणे परत केले. या पाकिटात रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे होती. या कार्यक्रमादरम्यान ओळख पटवून सुपूर्द केले. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते होसमनी यांचा सत्कार करण्यात आला.