होमपेज › Belgaon › नववीच्या विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या

नववीच्या विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 11:31PM

बुकमार्क करा

दांडेली : वार्ताहर

अभ्यासाचा ताण असह्य झाल्याने नववीत शिकणार्‍या 14 वर्षीय राहुल बंदे या विद्यार्थ्याने आईची ओढणी पंख्यास लावून गळफासाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दांडेली टाऊनशिप येथे रविवारी घडली. या घटनेची नोंद दांडेली शहर पोलिसात झाली आहे. रविवारी त्याचे मित्र त्याला खेळण्यासाठी बोलावयास गेले असता राहुल बंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.

रविवारी सकाळी आपल्या मित्रांबरोबर खेळून झाल्यानंतर राहुलने आपल्या मित्रांशी बोलताना ‘सायंकाळी 4.30 वा. तुम्ही मला खेळण्यासाठी बोलावण्यास याल त्यावेळी तुम्हाला सरप्राईज देणार,’ असे सांगून त्यांचा निरोप घेतला होता. सायंकाळी 4.30 वा. मित्र बोलावण्यास आले असता राहुलने आत्महत्या केल्याचे आढळले.मला अभ्यासाचा ताण असह्य होत असल्याचे राहुल आपल्याला सांगत असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. 

राहुल हा दांडेली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेणुका बंदे यांचा मुलगा असून आत्महत्येचे वृत्त समजताच काँग्रेस पदाधिकारी व नगराध्यक्ष एन. जी. साळुंके, माजी आ. सुनील हेगडे यांनी रेणुका बंदे यांची भेट घेऊन दुःख व्यक्त केले.  राहुलच्या आत्महत्येमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.