होमपेज › Belgaon › निजदला मत म्हणजे जातीयवादी भाजपलाच मत

निजदला मत म्हणजे जातीयवादी भाजपलाच मत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

म्हैसूर : प्रतिनिधी

निजदला मत देणे म्हणजे जातीयवादी भाजपलाच आहे. निजद ही भाजपची बी टीम आहे. यामुळे मतदारांनी डोळसपणे पक्ष आणि उमेदवाराला निवडून द्यावे. भाजप आणि निजदला साफ झिडकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

निजदला मतदार याचाच अर्थ काँग्रेसला कौल, असे रेशमी चिमटे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हैसूरमध्ये प्रचारावेळी काढले होते. हा धागा पकडून सिध्दरामय्या यांनी त्यांना टोला हाणला आहे. चामुंडेश्वारी येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि निजदचा खरपूस समाचार घेतला.

भाजपवर बरसताना ते म्हणाले, की भाजपने माझ्याविरुध्द निघालस खोटे आरोप केले आहेत. या पक्षाने काँग्रेसविरोधात खोटारडपणाचा कळस गाठला आहे. एकही आरोप त्यांना सिध्द करता आला नाही. काहीच मुद्दे नसल्याने भाजप कपोलकल्पित टीकाटिपणीत समाधान मानत आहे. 

केंद्रीय राज्य कौशल्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटनाबदलासंदर्भातील केलेले विधान आक्षेपार्ह आणि देशाच्या लोकशाहीला मारक आहे. याब्द्दल अमित शहा काहीच भूमिका घेत नाहीत. अशा विधानाबद्दल त्यांनी हेगडे यांना मंत्रिमंडळातून डच्चूच दिला पाहिजे. हेगडे सामान्य कागरिक नसून ते मंत्री आहेत. याचे भान ते विसरले का? भाजप तसे करणार नाही. कारण राज्यघटना कमकुवत करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. अशा फसव्या आणि घटनाविरोधी भाजपला मतदान करण्यापूर्वी जनतेने विचार करायला हवा.

सिध्दरामय्या हे बांदिपूरच्या रिसॉर्टमध्ये थांबून निवडणुकीसाठी पैशांची जुळवाजुळव करत असल्याचा आरोप निजदचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला होता. याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, असा करण्यापूर्वी कुमारस्वामी गतकाळात काय करत होते, याचे सिंहावलोकन करावे. म्हणजे सत्य कळून येईल.

पहिली यादी 12 रोजी

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी 12 एप्रिलला जाहीर करण्यात येईल. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींबरोबर सल्‍लामसलत सुरू आहे, असे सिध्दरामय्या यांनी सांगितले.


  •