Mon, Jun 17, 2019 02:40होमपेज › Belgaon › एपीएमसी बाजारपेठ होईल स्मार्ट

एपीएमसी बाजारपेठ होईल स्मार्ट

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 10:50PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहराचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार बाजारपेठही स्मार्ट व्हावी आणि शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, या उद्देशातून भाजीमार्केट उभारण्यात आले आहे. देशातील विविध बाजारपेठांचा अभ्यास करून भाजीमार्केट उभारण्यात आले असून राज्यातील एक आदर्श बाजारपेठ ठरणार असल्याचे प्रतिपादन आ. सतीश जारकीहोळी यांनी केले. 

येथील एपीएमसी मार्केटयार्ड आवारात नूतन भाजीमार्केट, एपीएमसीचा सुवर्ण महोत्सव आणि संडे बाजार उद्घाटन असा संयुक्त  सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव होते.  

या भागातील शेतकर्‍यांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून नूतन भाजी मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. राज्यामध्ये इतर बाजारपेठांपेक्षाही सरस ठरणारी ही बाजारपेठ आहे. राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. बाजारपेठेच्या संपूर्ण विकासासाठी 70 कोटी निधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यापैकी 25 कोटी वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित निधी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरवा करू, असे आ. जारकीहोळी यांनी सांगितले. 

एपीएमसी प्रवेशद्वार ते कंग्राळी मार्कंडेय नदीपयंर्ंतचा रस्ता दुपदरी करण्यात येणार असून यासाठी साडे पाच कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यामध्ये निविदा मागवून गाळ्यांचे वितरण व भाजीमार्केटला सुरूवात करण्यात येणार आहे.  भाजी मार्केटसाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे नमूद करत  बेळगावकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे आ. जारकीहोळी यांनी सांगितले.

यावेळी माजी अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांनी कोणत्याही पक्षातील नेत्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी कार्य केले पाहिजे. शेतकरी जगला तरच देशाची प्रगती शक्य आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हित जपण्याचे आवाहन केले. 

अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. एपीएमसी सचिव गुरुप्रसाद यांनी बाजारपेठेच्या विकासाचा आढावा घेतला.   महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 

व्यासपीठावर उपाध्यक्ष रेणुका पाटील, सदस्य अनंत पाटील, तानाजी पाटील, महादेवी खानगौड, महेश जुवेकर, युवराज कदम, आर. के. पाटील, लगमप्पा नाईक, सुधीर गड्डे, संजीव मादार, महेश कुगजी, मनोज मत्तीकोप, प्रमोद पाटील, नारायण कोले, बाशा जमादार, सावित्री लिंगनागौड जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जि.पं. सदस्य रमेश गोरल, सिद्धू सुणगार, ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील, उपाध्यक्ष मारुती सनदी, नागेश गड्डे, बाबुराव पिंगट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश पाटील, माणिक होनगेकर यांनी केले.