Sun, Nov 18, 2018 23:55होमपेज › Belgaon › स्वदेशी इंधन निर्मितीत संशोधन गरजेचे : संदीप रेड्डी

स्वदेशी इंधन निर्मितीत संशोधन गरजेचे : संदीप रेड्डी

Published On: May 21 2018 1:13AM | Last Updated: May 20 2018 8:53PMबेळगाव : प्रतिनिधी

वाहन व्यवसायात आज नवनवे बदल घडत असून जैविक इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून 10 टक्के इथेनॉल इंधन वापराला प्रोत्साहन देत आहे. देशामध्ये 70 ते 80 टक्के कच्च्या तेलाची आयात करण्यात येते. हे टाळण्यासाठी  इंधन क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. अभियंत्यांनी इंधन निर्मिती क्षेत्रात संशोधन करणे गरजेचे असल्याचे मत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेेशन लि.चे मुख्य प्रादेेशिक अधिकारी संदीप रेड्डी यांनी व्यक्त केले.

येथील शिवबसवनगरातील एस.जी.बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाचा यांत्रिक विभाग व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त सहकार्याने ‘लेटेस्ट टास्क अँट ट्रेन्ड्स इन ऑटोमोशन टेक्नॉलॉजी’ वर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने  ते बोलत होते.

अध्यक्षीय भाषणात बाळेकुंद्री  तांत्रिक महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. एस. एस. सालीमठ म्हणाले, अभियंत्यांनी भौतिक ज्ञान मिळविण्याबरोबरच संशोधनाकडेही मन वळविले पाहिजे. त्या अनुषंगाने विविध कंपन्यांकडून होणार्‍या इंटर्नशिपमध्ये भाग घेतला पाहिजे.

कार्यक्रमात नागशांती ह्युंदाईचे सतीश प्रभू व सहकार्‍यांनी सुरक्षितता व सेवा, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे दत्तात्रय माने यांनी वाहनविमा व अपघातग्रस्त वाहनाची पाहणी, कारवारचे प्रा. सुरेश माने यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये आधुनिकता, हायटेक टीव्हीएस मोटार्सचे राजेंद्र देसाई यांनी टीव्हीएस वाहनामध्ये नवे बदल तसेच अन्य मान्यवरांनी तांत्रिक विषयावर  मार्गदर्शन केले.