Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Belgaon › खानापूरनजीक अपघात; अंकलखोपचा तरुण ठार

खानापूरनजीक अपघात; अंकलखोपचा तरुण ठार

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:32AMभिलवडी :

गोवा - बेळगाव राज्यमार्गावर खानापूरजवळ अज्ञात वाहनाची धडक बसून   अंकलखोप  (ता. पलूस) येथील विनायक सुनील गायकवाड (वय 32) यांचा  मृत्यू झाला. विनायक हे गोवा येथील एका औषध कंपनीत नोकरीस होते. शनिवारी सकाळी ते पत्नी सिद्धी व मुलीसह चारचाकीतून अंकलखोपला येण्यास निघाले.

पत्नीची तब्बेत ठीक नसल्याने त्या मागील सीटवर झोपल्या होत्या. खानापूरजवळ आल्यावर विनायक लघुशंकेसाठी उतरले. दरम्यान, भरधाव वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. मोठा आवाज ऐकून पत्नी जाग्या  झाल्या.  वाहनाने ठोकरल्याने त्यांचा मोठा रक्‍तस्त्राव झाला होता. एका ट्रकचालकाने  त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. बेळगाव येथील के.एल.ई. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विनायक यांचा मृत्यू झाला.

Tags : Belgaum, Belgaum news, Near khanapur accident, Anklechhop, young kill,