Sun, Nov 18, 2018 04:58होमपेज › Belgaon › राष्ट्रध्वज दुरुस्तीचा खर्च मनपाला न झेपणारा : हेरेकर

राष्ट्रध्वज दुरुस्तीचा खर्च मनपाला न झेपणारा : हेरेकर

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 10:37PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव मनपा गरीब आहे. त्याकरिता महिन्यातून एकदा अतिउंच राष्ट्रध्वज फाटत आहे. याचा दुरुस्ती खर्च दर महिन्याला एक लाख रुपयांचा असून मनपाला झेपणारा नाही. याकरिता तो खर्च आमदार निधीतूनच केला जावा, अशी मागणी मनपा लेखा  समितीच्या अध्यक्षा सरला हेरेकर यांनी केली आहे.

सत्ताधारी गटनेते संजय शिंदे ध्वजाच्या खर्चाबद्दल म्हणाले, मनपाला तो आता पांढरा हत्ती पोसण्याचा खर्च करावा लागत आहे. मनपाच्या सफाई कर्मचार्‍यांचा चार महिन्यांचा पगार झालेला नाही. ही वस्तुस्थिती असताना मनपाला ध्वजासाठी दर महिन्याला एक लाख रुपयांचा खर्च डोईजड ठरत असल्याचे सरला हेरेकर म्हणाल्या. अतिउंच राष्ट्रध्वज उभा करण्यासाठी दीड कोटीचा खर्च केला आहे. यापुढेही देखभालीसाठी करावा लागणारा खर्च अवाढव्य असल्याने मनपाला तो परवाणार नसल्याचे सदस्यांनी म्हटले आहे.