Fri, Jul 19, 2019 07:49होमपेज › Belgaon › कपिलेश्‍वर रेल्वे उड्डाण पुलाचे आज नामकरण

कपिलेश्‍वर रेल्वे उड्डाण पुलाचे आज नामकरण

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:01AMबेळगाव : प्रतिनिधी

कपिलेश्‍वर मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे मंगळवारी ‘श्री कपिलेश्‍वर उड्डाणपूल’ असे नामकरण होणार आहे. सकाळी 11 वा. उड्डाणपुलाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. 

नुकताच पार पडलेल्या मनपा सर्वसाधारण बैठकीत या पुलाला ‘कपिलेश्‍वर उड्डाणपूल’ नाव देण्याचा  ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंगळवारी  या  पुलाचे नामकरण होणार आहे. कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, नगरसेवकांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.