होमपेज › Belgaon › नाले होणार अतिक्रमणमुक्‍त

नाले होणार अतिक्रमणमुक्‍त

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 11:04PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

नाल्यांच्या जागेत अतिक्रमणे झाल्यामुळे सांडपाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका प्रयत्न करू असून, शास्त्रीनगर परिसरातून वाहणार्‍या दोन नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या हालचालींना सुरूवात झाली आहे. 

मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सोमवारी शास्त्रीनगर परिसरातील काही नागरिकांना संभावीत कारवाईची माहिती दिली आहे. शास्त्रीनगर परिसरातून दोन्ही नाले वाहत असतात. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या या नाल्यांची रूंदी 30 फूट आहे. मात्र गेल्या 20 वर्षांत शास्त्रीनगरात नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. 2016 च्या पावसात तर शास्त्रीनगरपासून अरुण थिएटरपर्यंत पूर आला होता. त्यानंतर अतिक्रमण हटवण्याी सुरवात झाली होती. मात्र कारवाई अर्धवट राहिली.