Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Belgaon › पंधरा पैसे तरी मिळाले का

पंधरा पैसे तरी मिळाले का

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

म्हैसूर : प्रतिनिधी

प्रत्येक भारतीयाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा असतील, असे आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी दिले होते. ते 15 लाख नकोत, 15 पैसे तरी बँक खात्यावर जमा केले का? असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. जनाशीर्वाद यात्रेनिमित्त म्हैसूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना राहुल यांनी भाजप आणि रा. स्व. संघासह निजदवरही टीका केली. याच सभेत निजदच्या सात बंडखोर आमदारांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.

राहुल म्हणाले, मोदींनी केंद्रात भाजपची सत्ता येण्यापूर्वी विदेशातील  काळा पैसा देशात आणून गरिबांच्या बँक खात्यावर  जमा करू, असे  आश्‍वासन दिले होते.  मात्र ते निव्वळ फोल ठरले  आहे. 
 


  •