Sat, Jul 20, 2019 15:45होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्येमागे ‘उजवे’ 

गौरी लंकेश हत्येमागे ‘उजवे’ 

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 12:22AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येमागे उजव्या विचारसरणी  गटाचा  सहभाग असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाने अटक केलेल्या एका संशयित आरोपीकडून उघड झाली आहे. 
पथकाने गौरी लंकेश हत्येचा तपास करताना शस्त्रास्त्रविक्रेता के. टी. नवीनकुमार याला अटक केली  आहे. चौकशी करण्यासाठी पथकाने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. गौरी लंकेशच्या हत्येनंतर पोलिसांनी प्रथमच उजव्या विचारसरणीच्या गटातील एकाला अटक केली आहे. 

5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी यांची त्यांच्या निवासस्थानासमोरच गोळ्या घालून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी नवीनकुमारला अटक केली, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपायुक्‍त एम. एन. अनुचेत यांनी पत्रकारांना दिली.  नवीनकुमार (30) याचा संबंध उजव्या विचारसरणी गटाशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याला 19 फेब्रुवारी रोजी बेकायदा 5 जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याबद्दल अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र नियंत्रण कायद्याखाली गुन्हा नोंद करून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्याला पुन्हा विशेष पोलिस पथकाने आठ दिवस  हत्येची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी घेतली. हत्येची माहिती देणार्‍यासाठी गुप्तचर विभागाचे पोलिस महासंचालक बी. के. सिंग यांनी 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.