Wed, Apr 24, 2019 07:35होमपेज › Belgaon › मनपाचे आपत्ती निवारण पथक सज्ज

मनपाचे आपत्ती निवारण पथक सज्ज

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 10 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

पावसाळ्यात आपत्तीवेळी त्वरित मदत मिळण्यासाठी आपत्ती निवारण पथकाची स्थापना आंबेडकर गार्डनमध्ये रविवारी करण्यात आली. मनपाच्याया पथकात पाच जणांचा सामावेश आहे. आवश्यक सामग्रीसह चारचाकी वाहन दिमतीला असेल.

पावसाने रविवारी पहिलाच तडाखा दिला. मोठ्या पावसात झाडांची पडझड होते. त्यावेळेला वनखाते, अग्निशमक दल जवान, हेस्कॉम खात्याचे कर्मचारी वेळेत पोहोचले तरी आपत्ती  भागातील स्थिती निवारण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक सामग्री नसते. यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आपत्ती निवारण केंद्राची स्थापना रविवारी केली.

या केंद्रात पाच जणांचे पथक कार्यरत राहणार आहे. लहान सहा फावडे, मोठे चार फावडे, 12 घमेली, लाकूड कापावयाची मशीन, पाणी खेचण्यासाठी पाच एचपी पॉवर क्षमतेची मोटर, 50 फूट लांब पाईप, 100 फूट लांब नायलॉनची दोरी, दोन पहारीसह चारचाकी वाहनाचा सामावेश असणार आहे.

पाच जाणांचा समावेश असलेल्या पथकाला हेल्मेट, गमबुट, हातमोजे, रेनकोट देण्यात आले आहेत. पथक मदतीसाठी 24  तास उपलब्ध असेल. पावसाळ्यात ज्या ठिकाणी तातडीची गरज भासणार आहे तेथे हे पथक धावणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, वीजतारा तुटणे,  घरे कोसळणे, रस्ते वाहून जाणे अशा घटना घडत असतात. त्या ठिकाणी पथक तातडीने मदत पुरविण्यासाठी सज्ज असेल. 

मनपा आयुक्त कृष्णगौडा तायण्णवर, उदयकुमार तळवार यांनी आपत्ती निवारण केंद्र व साहित्याची पाहणी केली.