Sat, Nov 17, 2018 08:49होमपेज › Belgaon › एकसंब्यात पाण्याच्या भांड्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

एकसंब्यात पाण्याच्या भांड्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:00AMचिकोडी : प्रतिनिधी

घरातील पाण्याने भरलेल्या जर्मन भांड्यात पडून मुत्तूराज भीमराव माळगे या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा अंत झाल्याची घटना एकसंबा येथेे घडली. 

एकसंबा येथील आंबेडकर नगरात शेतमजुरीचे काम करणारे भीमराव माळगे पत्नी सुगंधा, मुली आरती, कीर्ती, भाग्यलक्ष्मी आणि  मुत्तूराज या मुलांसमवेत राहतात. 

सोमवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान मुत्तूराज रांगत रांगत जेवणाच्या खोलीत गेला. तेथे पाणी भरून ठेवलेल्या भांड्यात खेळता खेळता हात मारून पाण्यात पडल्याने श्‍वास कोंडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची झोपेत असलेल्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती.