Fri, Jul 19, 2019 15:40होमपेज › Belgaon › आंबेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन

आंबेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 11:08PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे रोजगार हमी योजनेतून कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करत नागरिकांनी तालुका पंचायतला घेराव घातला. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी याचे नेतृत्व केले.

आंबेवाडी ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रात आंबेवाडी, मण्णूर, गोजगा गावांचा समावेश आहे. या ठिकाणी कामगारवर्ग मोठ्या संख्येने आहे. परंतु ग्रा. पं. कडून काम उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांना कामाच्या शोधात बाहेर जावे लागत आहे. त्याचबरोबर 14 व्या वित्त आयोगातून कोणतीही विकासकामे हाती घेण्यात आलेली नाहीत. परिणामी गावचा विकास खुंटला आहे. यामुळे संबंधित ग्रा. पं. अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ता. पं. चे कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील अनुपस्थित असल्यामुळे व्यवस्थापक श्रीधर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी यावेळी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. सदस्या सरस्वती पाटील यांनी याबाबत अधिकार्‍यांना माहिती दिली.