Thu, Aug 22, 2019 13:20होमपेज › Belgaon › तेवरट्टीत ३०० हून अधिक भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

तेवरट्टीत ३०० हून अधिक भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:39AMशिरगुप्पी : वार्ताहर

कर्नाटक राज्यातील काँग्रेसप्रणित सिद्धरामय्या शासनाने राज्याच्या समग्र विकासासाठी केलेली कामे याबरोबर कागवाड मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत (तात्या) पाटील यांचे कार्य, व्यक्तीप्रतिष्ठा या पार्श्‍वभूमीवर तेवरट्टी गावातील भाजपच्या तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपला राम राम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे या गावात काँग्रेसमय वातावरण झाल्याने पक्षाला बळकटी आली आहे. 

या गावात काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत (तात्या) पाटील प्रचारार्थ मतयाचना करण्यासाठी आले असता प्रथम स्वयंप्रेरणेने भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत करून श्रीमंत पाटील सुसंवाद साधताना म्हणाले, केंद्रातील भाजप शासन गोरगरीब दिनदलित, तळागाळातील, तसेच शेतकर्‍यांसाठी काहीच केले नाही. म्हणून युवावर्ग काँग्रेस पक्षात दाखल होत. काँग्रेसला पाठबळ देत आहे. 

ते पुढे म्हणाले, राज्यातील सिद्धरामय्या सरकार लोक कल्याण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधून संपूर्ण देशात एक अव्वल दर्जाचे सरकार म्हणून काँग्रेसचा इतिहास निर्माण केला आहे. या राज्याला काँग्रेसचा इतिहास निर्माण केला आहे. या राज्याला काँग्रेसचा इतिहास असून हे राज्य देशात काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या पक्षाशिवाय राज्यात पर्याय नसून यावेळी जनतेच्या पाठबळावर काँग्रेस विजयी होणार आहे. 

याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते सुशांत पाटील म्हणाले, कागवाड मतदार संघ आदर्श मॉडेल बनविण्यासाठी सुजाण, तज्ञांच्या मार्गदर्शनातून विकासाचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये पाणी, रस्ते, उच्च शिक्षण, शेतीचा विकास, क्षारपडीक जमिनीची समस्या, वीज समस्या, लघु औद्यागिक विस्तार, कृषी उत्पन्न बाजार समित्या या विषयांचा समावेश असून मतदारांच्या पाठबळ व आशिर्वादावरही कामे करण्यासाठी आपण श्रीमंत (तात्या) पाटील यांंना विजयी करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मदभावी काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष महादेव कोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Tags : belgaon, belgaon news, Tewarti, BJP workers, Congress