होमपेज › Belgaon › राज्यात यंदा तीन दिवस अगोदर मान्सून

राज्यात यंदा तीन दिवस अगोदर मान्सून

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 11:36PMबंगळूर : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांसह सर्वांनाच  मान्सूनची प्रतीक्षा लागलेली आहे. यावर्षी मान्सून 2 जूनला कर्नाटकात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तविलो. याआधी मान्सून 5 जूनला कर्नाटकात दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. गुरुवारच्या अंदाजानुसार मान्सून  3 दिवस अगोदरच कर्नाटकात दाखल होणार  आहे. त्यामुळे  शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अंदमान, केरळ, गोवा, तळकोकण व त्यानंतर महाराष्ट्र? कर्नाटक असा मान्सूनचा प्रतिवर्षाचा प्रवास असतो. अंदमानात 25 ते 26 मे पर्यंत मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर केरळमध्ये 29 किंवा 30 मे ला दाखल होईल. गतवर्षाच्या तुलनेत 2018 मध्ये मान्सूनपूर्व (वळीव) पाऊस सर्वोत्तम झाला आहे. गेल्या 5 वर्षांपेक्षा यावर्षी झालेला मान्सूनपूर्व पाऊस हा सरारीपेक्षा 40 टक्के अधिक होता, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. अल निनो (समुद्रातून उष्ण पाण्याचा प्रवाह) किंवा ला निनो (थंड  पाण्याचा प्रवाह) यासारख्या आपत्तींमुळे मान्सूनवर परिणाम होतो.  यंदा नसल्याने पावसाची स्थिती समाधानकारक असेल, असे हमामान खात्याने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.