Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Belgaon › बेळगावचा मोहम्मद मुल्‍ला दहावीत राज्यात दुसरा

बेळगावचा मोहम्मद मुल्‍ला दहावीत राज्यात दुसरा

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:35AMबेळगाव : प्रतिनिधी

येथील सेंट झेवियर्सचा विद्यार्थी मोहम्मदकैफ मुल्‍ला याने 625 पैकी 624 गुण मिळवून दहावी परीक्षेत राज्यात दुसरा येण्याचा मान मिळविला आहे. त्याने इंग्रजीत 125, कन्‍नड 100, हिंदी 100, गणित 100, समाज विज्ञान 100 अशा पाच विषयांत पैकीच्या पैकी तर विज्ञान विषयात 99 गुण  मिळविले आहेत.

दरम्यान, बारावी निकालाच्या तुलनेत यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावीचा निकाल चांगला लागला आहे. जिल्ह्याने क्रमवारीत 25 वरून 6 व्या स्थानी झेप घेतली आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल 67.78 टक्के लागला होता. यंदा त्यात 16.99 टक्के सुधारणा होऊन 84.77 टक्के लागला. तर राज्याचा एकूण निकाल 71. 33 टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 4.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उडपी प्रथम, कारवार द्वितीय, चिकोडी शैक्षणिक जिल्हा तृतीय आणि बेळगाव शैक्षणिक जिल्हा सहाव्या स्थानी आला. बेळगावने पंचविसाव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली असून, शिक्षण खात्याने निकाल वाढीसाठी हाती घेतलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्या. तर चिकोडीची क्रमवारी ‘जैसे थे’ राहिली.

सोमवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी  गुण मिळविले. तर आठ विद्यार्थ्यांनी 625 पैकी 624 गुण मिळविले. त्यामध्ये बेळगावातील मोहम्मदकैफ मुल्‍ला याचा समावेश आहे. सहा सरकारी शाळांचा  आणि 35 अनुदानित शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. 102 सरकारी, 414 अनुदानित आणि 826 विनाअनुदानित शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.
यंदा 4,56,103 विद्यार्थी आणि 3,98,321 विद्यार्थिनींनी दहावी परीक्षा दिली. उत्तीर्ण होणार्‍यांत यंदाही विद्यार्थिनींनीच बाजी मारली असून त्यांची टक्केवारी 78.01 इतकी आहे. तर 66.56 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आहेत. शहरी भागातील 69.38 टक्के विद्यार्थी तर ग्रामीण भागातील 74 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

बेळगावातील सेंट झेवियर्सचा मोहम्मद कैफ मुल्‍ला, म्हैसुरातील सद्विद्या स्कूलची आदिती राव, उडपीतील कुंजीबेट्टमधील मेधा भट, बंगळूर ग्रामीणमधील नेलमंगलातील थॉमस मोमो स्कूलचा श्रीनिवास एम. ए., म्हैसुरातील सद्विद्या स्कूलची कीर्तना आर., मुडबिद्री अल्वास स्कूलचा प्रांशुल प्रशांत, बंगळूर दक्षिणमधील सरस्वती विद्यापीठाचा श्रीहरी अडिग यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

दोघांना 100 टक्के गुण 7 बीईएल 67, 68

म्हैसुरातील सद्विद्या विद्यालयाचा विद्यार्थी यशस आणि बंगळुरातील होली चाईल्ड इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सुदर्शन यांनी  पैकीच्या पैकी म्हणजे 625 पैकी 625 गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.