Fri, Jan 18, 2019 10:09होमपेज › Belgaon › मोदी म्हणजे खोटे बोलणारा राजा

मोदी म्हणजे खोटे बोलणारा राजा

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 9:10PMबंगळूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे खोटे बोलणारा राजा अशी गंभीर टीका अखिल काँग्रेसचे प्रवक्ते रमनदीप सिंग सूरजेवाला यांनी केली आहे. गेल्या चार वर्षापासून मोदी सरकार सत्तेवर असले तरी त्यांनी कोणत्याच अश्‍वासनांची पूर्तता केली नसल्याची टीकाही त्यांनी केली. 

ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी 2 कोटी रोजगार निर्माण करून परदेशी बँकातील काळा पैसा देशात आणून व देशातील गरिबांच्या अकाऊंटवर 15 लाख रुपये जमा करू अशी आश्‍वासने दिली होती. त्यांची ती आश्‍वासने फोल ठरली आहेत. सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असला तरी तो निवडणुकीचा विषय ठरत नाही. या विषयावर नरेंद्रमोदी व अमित शहा यांनी मौन बाळगलेले आहे.