Sun, May 26, 2019 13:11होमपेज › Belgaon › मोदी बढाईखोर : सिध्दरामय्या

मोदी बढाईखोर : सिध्दरामय्या

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 11:54PMबंगळूर : प्रतिनिधी 

पंतप्रधान मोदी यांचे कार्य शून्य आहे. ‘मन की बात’ मधून ते केवळ बढाया मारतात, अशी टीका मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केली. येथे शुक्रवारी प्रचारसभेत ते बोलत होते.  मोदी हे राज्याच्या भेटीवर जेव्हा येतात त्यावेळी खोटी आश्‍वासने देत असतात. जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी पध्दतशीरपणे चालविले असल्याचे सिध्दरामय्या म्हणाले.गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवेगौडांना वृध्दाश्रमात दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आता देेवेगौडांचे गोडवे सुरू केले  असल्याची टीकाही सिध्दरामय्यांनी केली.