Sun, May 26, 2019 19:50होमपेज › Belgaon › मोबाईलबंदी कागदावरच!

मोबाईलबंदी कागदावरच!

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 30 2018 8:45PMबेळगाव : प्रतिनिधी

शाळा गजबजण्यास सुरुवात झाली असून, तिसरा दिवस चालू झाला तरी शासनाने बजावलेल्या मोबाईल बंदीची अंमलबजावणी शिक्षकाकडून झालीच नाही. वर्गात शिकवित असताना मोबाईल स्वीच ऑफ करावा, हा नियम धाब्यावर बसवत शिक्षकांनी प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोबाईल वापरणे सुरूच ठेवले आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांशी संवाद साधता मिळाली.

प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरु नये असा नियम सरकारने बनविला आहे. शिक्षकांनी मोबाईल वापरु नये म्हणून त्यांच्यावर देखरेख करण्याचे काम मुख्याध्यापकांवर सोपविले आहे. मात्र शाळा सुरु होऊन तीन दिवस झाले तरी ेरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे शाळेत शिक्षकांंनी मोबाईल वापरणे सुरूच ठेवलेे आहे.शहर परिसरातील कांही खासगी शाळेत मोबाईल शाळेत वापरण्यास बंदी आहे. सरकारी शाळेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मोबाईल जवळ बाळगावा मात्र तो स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर ठेवावा. असा नियम आहे. 

मोबाईलची सर्वाना इतकी सवय झाली आहे की तो कांही काळ जवळ नसेल तर, चुकल्यासारखे वाटते. पूर्वी घरातून बाहेर पडताना रुमाल, पैशाचे पाकीट घेतलास का अशी आरोळी ऐकावयास मिळायची. आता मोबाईल घेतलास का, अशी विचारणा होते. बालचमूपासून वयोवृध्दापयर्र्ंत मोबाईल वापरण्याची सवय जडली आहे. आता शाळेत शिकविताना मध्येच शिक्षकांच्या मोबाईलची रिंग वाजली की शिकविण्याची कडी तुटते आणि मुलांचे लक्ष मोबाईलकडे जाते. शिकविणे सोडून शिक्षक वर्गाबाहेर मोबाईलवर शिक्षक बोलताना आढळून येतात. 

मोबाईल जरुर वापरा मात्र तो शाळेच्या वेळेत नका,. असा नियम शासनाने बनविला आहे. या नियमाचे पालन न करणार्‍या शिक्षकावर कारवाई करण्याचा अधिकार मुख्याध्यापकाजवळ आहे. याची काटेकोर अम्मलबजावणी मुख्याध्यापकाकडून होणे गरजेचे आहे.संदेश पोहचविण्याचे महत्वाचे साधन म्हणून मोबाईलचा वापर केला जातो. शिक्षकांना शाळेत मुलांची पटसंख्या, मध्यान्ह आहारासाठी मुलांची संख्या कळवण्यासाठी, शासनाचे आदेश वेगाने पोहचविण्यासाठी मोबाईलचा वापर होतो. मात्र वर्ग सुरु असताना पाठ्यक्रम शिकविण्याचे सोडून शिक्षक मोबाईलवर बोलत असल्याने त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत आहे.

“आमच्या शाळेत शाळेत प्रवेश केल्यानंतर मोबाईल ऑफ ठेवावा लागतो. शासनाचा नियम लागू होण्यापूर्वीपासून हा दंडक लागू आहे. तो इतरही शाळेमध्ये अमलात आणावयास हवा. -नम्रता पाटील, शिक्षिका, मराठी विद्यानिकेतन.

“मोबाईलबंदीचा नेमका आदेश काय, हे सध्या मला माहीत नाही. आदेशाचा अभ्यास करून पुढची कार्यवाही करु.” -चंद्रप्पा के. एच., जिल्हा शिक्षणाधिकारी, बेळगाव.