होमपेज › Belgaon › कुद्रेमानीजवळील जुगार-मटका अड्डाचालक अद्याप मोकाटच!

कुद्रेमानीजवळील जुगार-मटका अड्डाचालक अद्याप मोकाटच!

Published On: Aug 24 2018 12:41AM | Last Updated: Aug 23 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

कुद्रेमानीजवळ पोलिसांनी छापा टाकून 40 जुगार्‍यांना अटक केली असली तरी जुगार-मटका अड्डाचालक बेपत्ता आहेत. खेळणार्‍यांवर कारवाई झाली असली तरी मूळ सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश येणार का, असा प्रश्‍न आहे.

कर्नाटक?महाराष्ट्राच्या सीमेवर राजरोसपणे सुरू असलेल्या जुगारी अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 40 जुगार्‍यांना अटक करून सव्वाचार लाख रुपये, 44 दुचाकी 5 कार जप्‍त केल्या आहेत. मात्र, हा अड्डा चालविणारे राजू नामक मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. ते दोघे असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. दोघांची नावेही राजूच आहेत. त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या  जुगार अड्ड्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही, हा प्रश्‍न असून, पोलिसांनी अड्ड्याची माहिती असूनही कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा संशय घेण्यास वाव आहे.  यामुळेच जुगार अड्डाचालकांचे फावले आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादावरूनच  जुगार अड्डा चालवला जात असल्याची चर्चा आता आहे. अशा अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यशस्वी ठरणार का, असा सवालही आता उपस्थित करण्यात येत आहे. जुगार खेळणारे अटक व सूत्रधार मोकाट काय हीच पस्थिती राहणार का, असा सवालही करण्यात येत आहे.