बेळगाव : प्रतिनिधी
राज्याचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालमत्तांप्रकरणी बेळगावतही गुरुवारी तपास करण्यात आला. बंगळूरहून प्राप्तिकर खात्याचे दोन अधिकार्यांचे एक पथक गुरुवारी सायंकाळी बेळगावात दाखल झाले. त्यांनी शहरातील काँग्रेस नेत्यांकडे तपास चालवला आहे.
तीन महिन्यांपूर्वी प्राप्तिकर खात्याने शिवकुमार व त्यांचे नातेवाईक तसेच मित्रांची बंगळूरमधील निवासस्थाने, रिसॉर्ट, कार्यालयांवर छापे घातले होते. त्या छाप्यात मिळालेल्या माहितीनुसार अधिकार्यांनी गुरुवारी सायंकाळी बेळगावमध्ये एका काँग्रेस नेत्याच्या घरी तपास सुरू केला.