Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Belgaon › वसतिगृहांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा?

वसतिगृहांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा?

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 10 2018 11:34PMहुबळी : प्रतिनिधी  

   
समाजकल्याण खात्यातर्फे राज्यातील अनुसूचित जाती? जमातीच्या विद्यार्थी वसतिगृहांच्या  व इतर मागासवर्गीय वसतिगृहांच्या नावावर एकूण 2,157 कोटी रु.चा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुराप्पा यांनी केला आहे.  

भाजपने राज्यातील वसतिगृहांचा  व तेथील समस्यांचा सर्व्हे करून हा घोटाळ्याचा दावा केला आहे. हा अहवाल भाजपने बंगळूर, हुबळी व राज्यातील प्रमुख शहरांमधून जाहीर केला आहे. 

निधीचा गैरवापर करून वसतिगृहातील खाट, बिछाना खरेदी, जेवणावर लादण्यात आलेला खर्च,  उशा खरेदी व इतर मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली हा कोट्यवधींचा घोटाळा समाजकल्याण खात्याने केल्याचा आरोपही भाजपने केला आहे. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी म्हटले आहे की, सर्वच वसतिगृहांमध्ये अनेक समस्यांना गरीब विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारने वसतिगृहांवर कोट्यवधी रु.चा खर्च दाखविला असला तरी येथील समस्या पाहिल्या तर ते विद्यार्थी कसे जगत असतील, त्यांची मला चिंता वाटते. वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची, स्नानगृहांची व टेबल?खुर्च्यांची अवस्था मोडकळीस आल्यासारखीच आहे. अनेक वसतिगृहातील खोल्या विद्यार्थ्यांना राहण्यास अयोग्य  बनल्या आहेत. एक तृतियांश  वसतिगृहे तर भाडोत्री इमारतीमध्ये चालविण्यात येतात. या घोटाळ्याची सरकारने न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही जगदीश शेट्टर यानी केली आहे.

काही वसतिगृहामध्ये तर विद्यार्थ्यांना व्यवस्थित न्याहारी, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवणही मिळत नाही. खूपच निकृष्ट पध्दतीने हे जेवण तयार केलेले असल्याने विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारीबद्दल सामना करावा लागत आहे. काही वसतिगृहांमध्ये तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना एकाच खोलीत राहण्यास भाग पाडले जाते. तर काही इस्पितळांमध्ये एका खोलीमध्ये 15 विद्यार्थ्यांना राहण्यास भाग पाडले आहे. या परिस्थितीमध्ये ते विद्यार्थी आपला अभ्यास कसा करणार, असा प्रश्‍न जगदीश शेट्टर यानी मुख्यमंत्री सिध्दरामय्या याना केला आहे. 

दोन तृतियांश वसतिगृहांमध्ये तर टीव्ही व  संगणकाचा अभाव आहे. 25 टक्के वसतिगृहांमध्ये ग्रंथालये व पुस्तके नाहीत. 90 टक्के वसतिगृहांमध्ये क्रीडासाहित्य व शारीरिक शिक्षण शिक्षकांचा अभाव आहे. 25 टक्के वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिलेली नाही. या परिस्थितीत मुख्यमंत्री सिध्दरामय्या अनुसूचित जाती? जमाती विद्यार्थ्यांचा विकास कसा करणार, असा प्रश्‍न जगदीश शेट्टर यांनी केला आहे.