Mon, Jun 24, 2019 17:34होमपेज › Belgaon › कर्नाटकातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाका : आशिष शेलार

कर्नाटकातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाका : आशिष शेलार

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 8:48PMनिपाणी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चालविले आहे. सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार देशाचा कारभार सुरू आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीची पुनरावृत्ती कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होणार  आहे. काँग्रेसचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केले. 

निपाणी येथे नवशक्‍ती कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शेलार  पुढे म्हणाले, जीएसटीमुळे व्यापार्‍यांना फायदा झाला असून उज्ज्वला गॅस सर्वसामान्यांच्या घराघरात गेला आहे. कर्नाटकात काँग्रेसने भ्रष्टाचारी कारभार केला असून हे सरकार उलथवून टाकण्याची गरज आहे.

आ. शशिकला जोल्ले  यांनी, पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतूक देश-विदेशातून होत आहे. कर्नाटकात विरोधी पक्षाचे सरकार असताना आपण केंद्र व राज्य सरकारकडून निपाणी भागाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून विकास केला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून आरोप होत असून आमिषे दाखविली जात आहेत. त्याकडे लक्ष न देता विकासाच्या पाठिशी राहण्याचे आवाहन केले.

यावेळी राज्य भाजपचे प्रभारी सत्यजितसिंग, सहकारनेते आणासाहेब जोल्ले, माजी मंत्री शशिकांत नाईक, बाबा देसाई, सयाजी भोसले, उज्ज्वला बडवाण्णाचे, जयवंत भाटले, संजय शिंत्रे, हालशुगरचे संचालक एम. पी. पाटील, समित सासणे, जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे, सिद्धू नराटे आदी उपस्थित होते.