Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Belgaon › अडीच हजार भावांकडून बहिणींना ‘शौचालय’ भेट

अडीच हजार भावांकडून बहिणींना ‘शौचालय’ भेट

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:38PMबेळगाव : प्रतिनिधी

राखीपौर्णिमा हा बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारा सण. बहीण या दिवशी  लाडक्या भाऊरायाच्या हातावर राखी बांधून औक्षण करते. भाऊ बहिणीला आवडती भेटवस्तू देतो. यावर्षी जिल्ह्यातील 2400 हून अधिक भावांनी आपल्या बहिणींना आगळीवेगळी भेट दिली. भेट म्हणून शौचालय देण्यात आले आहे.

जिल्हा पंचायतीने हा अभिनव उपक्रम मागील वर्षापासून सुरू केला आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी शौचालय बांधून देण्याचे अभियान राबविले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. याचा लाभ हागणदारीमुक्त जिल्हा अभियानाला होत आहे.

2 ऑक्टोबरपर्यंत बेळगाव जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार जि. पं. प्रशासनाने केला आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असून ‘घर तेथे शौचालय’ अभियान गतिमान केले आहे. जिल्ह्यात अद्याप चाळीस हजार शौचालय उभारणीचे काम प्रलंबित आहे. यासाठी प्रयत्न करण्यात येत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी नवनवे उपक्रम हाती घेतले आहेत.

राखीपौर्णिमेचे औचित्य साधून 2400 शौचालय बहिणीकडे भावांनी सुपूर्द केले. मागील वर्षीही या अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला होता. या अभिनव अभियानाचे कौतुक करण्यात येत आहे.